नांदुरा शहरातील गांधी चौक भागातील जाणता राजा चौक सार्वजनिक जागेवर जलमंदिर पाणपोई तोडण्यात आली त्याच जागेवर पोलीस चौकी करण्यात यावी ज्येष्ठ पत्रकार सुरेशदादा पेटकर यांची मागणी


नांदुरा शहरातील गांधी चौक जाणता राजा भागात गेली 2001 मध्ये मुख्य रस्त्यावर सार्वजनिक जागेवर शहरातील दानशूर व्यक्ती व फ्रेंड्स ग्रुप नांदुरा सामाजिक संस्थेमार्फत प्रमुख मार्गावर सर्वसामान्य गोरगरीब व ग्रामीण भागातील नागरिकांना थंड पिण्याचे पाणी मिळावे यासाठी त्या ठिकाणी फ्रेंड्स ग्रुप नांदुरा व नांदुरा नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जलमंदिर व जाणता राजा पोलीस चौकी बांधण्यात आली ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना थंड पिण्याचे पाणी व त्या भागात शहरातील प्रमुख मार्ग असल्यामुळे गांधी चौक . उस्मानिया नगर. कुरेशी नगर. शहा नगर. आंबोळा नाका. घास मंडी घासलेटपुरा. नांदुरा खुर्द हा परिसर अत्यंत जवळचा तसेच शहरातील सर्व धर्मीय बांधवांच्या मिरवणुका याच मार्गाने जात असल्याने या ठिकाणी प्रमुख मार्गावर नांदुरा पोलीस चौकीची नितांत आवश्यकता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे या ठिकाणी असलेली फ्रेंड्स ग्रुपने बांधलेली सार्वजनिक जागेवरील जलमंदिर स्वार्थापोटी तोडल्यामुळे या भागात सर्व सामान्य नागरिकांमध्ये जर माणसात ही चर्चा आहे की त्याच जागेवर नांदुरा पोलीस स्टेशन व नांदुरा नगरपालिकेच्या प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने त्या ठिकाणी नव्याने पोलीस मदत केंद्र चौकी निर्माण व्हावी जेणेकरून या भागात कायमस्वरूपी कुठलेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच सर्वसामान्य नागरिकांना 24 तास त्या ठिकाणी शांततेची हमी राहील 

नांदुरा शहरातील गांधी चौक मार्गावरील जाणता राजा जलमंदिर कुठलीही नगरपालिका प्रशासनाचे परवानगी न घेता विनापरवानगी तोडण्यात आले आहे त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना कायमस्वरूपी व त्या परिसरात ग्रामीण भागातील व शहरातील भाजी मंडी असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात दररोज गर्दी असते त्याचप्रमाणे शहरातील प्रमुख बाजारपेठ याच भागात असल्याने भविष्यात कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नांदुरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार गेली 40 वर्षापासून नांदुरा पोलीस स्टेशन शांतता समिती सदस्य नात्याने नेहमीच शहरात कायमस्वरूपी शांतता राहावी यासाठी प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ शांतता समिती सदस्य सुरेश दादा पेठकर नांदुरा व इतर सदस्यांनी या ठिकाणी नांदुरा नगरपालिका व पोलीस स्टेशन अधिकारी नांदुरा यांच्या संयुक्त या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या व रहिवासी नागरिकांच्या मागणीस तो या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस मुदत केंद्र चौकी उभारण्यात यावी अशी मागणी 
प्रति 
माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा 
माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा 
माननीय आमदार श्री चैनसुख्जी संचेती विधानसभा सदस्य मलकापूर मतदारसंघ यांच्याकडे विनंतीपूर्वक मागणी द्वारे केली आहे याचे यांनी या मागणीचा सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा असल्याने याची दखल घेणे ही नम्र विनंती रास्ता पेक्षा करण्यात येत आहे

إرسال تعليق

أحدث أقدم