नांदुरा : आज दिनांक 25 मार्च 2026 रोजी नांदुरा तालुक्यात शेतकरी व शेतमजूर यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी Sharad Joshi साहेब यांच्या विचारधारेवर प्रेरित होऊन चांदूर बिसवा येथे नांदुरा तालुका शेतकरी संघटनेची स्थापना करण्यात आली.
या वेळी जिल्हाध्यक्ष दामोदरजी शर्मा, रंजीत भाऊ डोसे, बाबुराव पाटील (मलकापूर), शेतकरी नेते सुनील भाऊ करांगळे, नंदू भाऊ बारस्कर, विकास भाऊ, शास्त्री भाऊराव तसेच नांदुरा तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
बैठकीदरम्यान सर्वानुमते नांदुरा तालुका शेतकरी संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
तालुका अध्यक्ष : विठ्ठल भाऊ वानखडे
उपाध्यक्ष : मोहन भाऊ रोहनकर
सचिव : विजय बडे, विजय डोळे
संघटक : सुरेश सपकाळ
युवा अध्यक्ष : प्रकाश बाबाराव देशमुख
युवा उपाध्यक्ष : मोहम्मद परवेज, मोहम्मद अजीज
युवा सचिव : राजू हिवराळे
युवा संघटक : विष्णू हागे
अल्पसंख्यांक अध्यक्ष : अब्दुल न्याय, अब्दुल मजीद
उपाध्यक्ष : सलीम खान, इलियास खान
सचिव : शेख जाहीर
संघटक : मोहम्मद परवेज, शेख जाकीर
यावेळी नांदुरा तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवांनी शेतकरी संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला. शेतकरी व शेतमजूर यांच्या हक्कासाठी संघटना सदैव तत्पर राहील, असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
बैठकीच्या शेवटी सर्वांनी एकमुखाने घोषणा दिली –
“जय जवान जय किसान” 🌾✊