* यासाठी जिल्हा व तालुका नांदुरा या वतीने निवेदन देण्यात आले आहे .नराधम आरोपी रोहित पगारीया,गब्बू गुजरीवाल,प्रशांत संगेले यांच्यावर तात्काळ अटकेची मोका बंदीकार्यवाही करून कठोर शासन करणेबाबत...*
दिनांक" 23/07/20250 रोजी तु गाय चोर है" आरोप करत दलीत तरुण रोहन पैठणकर यास बेदम मारहाण केली.धर्म जाणून घेण्यासाठी अंडरवेअर काढली व माणुसकीला काळिमा लावणारा प्रकार घडला. खामगाव मध्ये गाय चोर असल्याच्या संशयावरून तीन आरोपींनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली.नंतर तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी तिन्ही आरोपींवर गुन्हा क्र.227/25 अन्वये अट्रोसिटीसह,भारतीय न्याय संहितेच्या विविध दखलपात्र कलमानुसार गुन्ह्याची नोंद केली.परंतु कोणत्याही प्रकारे गांभिर्य व तत्परता न दाखविता आरोपी आजही मोकाट आहेत.अद्यापपर्यंत अटकेची कार्यवाही झाली नाही.या तिन्ही सराईत गुन्हेगारांना नेमके कोण पाठीशी घालत आहे हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. त्या तिन्ही गुन्हेगारांनी निर्लज्जपणाचा कळस गाठून त्याचा धर्म तपासण्यासाठी तरुणाचे कपडे उतरवून तू कुठल्या धर्माचा आहे अशी सुद्धा विचारणा केली.हे अतिशय गंभीर आहे.खरं पाहिलं तर या प्रकरणातील तीनही आरोपी युवक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे समजते त्यातील गब्बू गुजरीवाल या आरोपीवरती MPDA नुसार कारवाई सुद्धा केली होती व अशाच प्रकारचे अनेक गुन्हे या युवकांवरती खामगाव शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. त्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जिल्ह्यातून तडीपार करावे अशी मागणी देखील भिम आर्मी (भारत एकता मिशन )बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष भाई शैलेश वाकोडे नांदुरा तालुका अध्यक्ष भाई सागर मेढे,नांदुरा शहर अध्यक्ष गणेश भिडे नांदुरा,तालुका महासचिव रोशन भाई सरदार,तालुका सरचिटणीस धम्मपाल ह, तायडे,मनोज भाई इंगळे सहकार्य अध्यक्ष,धम्मपाल तायडे तालुका संघटक,संघपाल खंडेराव तालुका सचिव,पंकज इंगळे सचिव, हर्षवर्धन तायडे सचिव, विवेक मेढे, गजानन वाकोडे, भीमराव वानखडे, रोहन इंगळे, योगेश तायडे, निलेश तायडे, आनंद राणीत, अजय गाडे, राहुल भाई,हे सर्व पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे यामध्ये असलेला मुख्य आरोपी रोहित पगारीया हा दोन धर्मात तेढ निर्माण करणारा व समाजात अशांतता रहावी याकरिता उग्र विधाने करीत असतो.यांच्या कथित संगटनेवर देखील बंदी आणून त्याच्या मुसक्या लवकरात लवकर आवळण्यात याव्या.व आरोपींना कठोर शासन करून पीडित परिवाराला न्याय देण्यात यावा ही नम्र विनंती.अशा प्रकारचे निवेदन भिम आर्मी बुलढाणा जिल्हा व नांदुरा तालुका यांच्या वतीने..
मा.
मुख्यमंत्री, गृहमंत्री,
महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय मुंबई.
मा.
तसीलदार साहेब नांदुरा यांना देण्यात आले.
भाई शैलेश वाकोडे
भीम आर्मी (भारत एकता मिशन)
जिल्हाउपाध्यक्ष बुलढाणा
9156111102
भाई सागर मेढे
भिम आर्मी (भारत एकता मिशन )
नांदुरा तालुका अध्यक्ष
9529941922
भाई रोशन सरदार
भिम आर्मी (भारत एकता मिशन )
नांदुरा तालुका महासचिव
7414986400
Tags
नांदुरा