नांदुरा (प्रतिनिधी) – नांदुरा नगर परिषदेच्या आवारात रोजच एक गाडी “POLICE” या नेमप्लेटसह उभी राहते, आणि त्यामुळे नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की हे खरेच नगर परिषद आहे की पोलीस स्टेशन?
👉 सदर वाहन मालक व अधिकारी हे पोलिस विभागाशी काहीही संबंध नसताना पोलीस नेमप्लेटचा वापर करून संपूर्ण पोलीस खात्याचा घोर अपमान करत आहेत.
🚨 तोतया पोलीसांचा हा प्रकार अतिशय गंभीर!
हे अधिकारी प्रवास करत असताना एखाद्या अपघातग्रस्ताला मदत करणार नाहीत, परंतु स्वतःच्या ऐटबाज प्रदर्शनासाठी पोलिसांची नेमप्लेट लावून फिरत आहेत. केवळ नातलग पोलीस खात्यात असल्यामुळे चारचाकीवर अशी नेमप्लेट वापरण्याचा कोणताही अधिकार नाही!
काही दिवसांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब नांदुरा दौर्यावर आले असताना हाच मुद्दा त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. तरीदेखील आजतागायत कारवाई झालेली नाही.
👉 आज रोजी होणाऱ्या शांतता समितीच्या बैठकीत या मुद्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि पत्रकार बांधवांनी ठाम पवित्रा घेऊन सदर नेमप्लेट तात्काळ काढून घ्यावी.
⚡ अन्यथा या तोतया पोलीसावर थेट गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणे भाग आहे!
✍️ श्री. पुरुषोत्तम वसाने
स्वाभिमानी शिव संदेश प्रतिनिधी,
विशेष पोलीस – पोलीस मित्र.