बुलढाणा दिनांक : 29/9/2025,
मा जिजाऊ फाउंडेशन च्या वतीने विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात त्यापैकीच एक म्हणजे दुर्गवोत्सवामध्ये दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून देशाच्या आणि सामाजाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान मा जिजाऊ फाउंडेशन च्या वतीने केला जातो.
चूल आणि मूल सांभाळणारी महिला आता बाहेर पडून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे.
पण पुरुषप्रधान संस्कृतीमुळे महिलाना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. घरातली सर्व कामे सांभाळून नोकरी करणे किंवा बाहेर पडून काम करणे ही एक तारेवरची कसरत आहे पण घर आणि कर्तव्य या दोन्ही कामांची सुरेख गुंफण करून आजची महिला कर्तुत्व गाजवत आहे.
अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केल्याने त्यांना प्रोत्साहन मिळते कार्य कर्तृत्व गाजवण्याची ऊर्जा त्यांना मिळते असे प्रतिपादन मा जिजाऊ फाउंडेशन च्या अध्यक्षा जयश्री ताई बोराडे यांनी केले.
आणि म्हणूनच मा जिजाऊ फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी दुर्गोत्सवामध्ये विविध क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांना सन्मान नवदुर्गांचा हे सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात येते.
बुलढाणा येथील सरकारी रुग्णालयातील महिला कर्मचारी तसेच बुलढाणा पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस, आणि समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान मा जिजाऊ फाउंडेशन च्या वतीने सन्मानपत्र देऊन करण्यात आला.
उपरोक्त कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश राजपूत मा जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्रीताई बोराडे कार्यतत्पर महिला पोलीस कोकीलाताई तोमर यांच्या हस्ते कर्तृत्वान महिलांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.