🌹 समद कुरेशी यांची मलकापूर उपतालुका प्रमुख पदी निवड 🌹


मलकापूर (प्रतिनिधी) – शिवसेना (उबाटा गट) चे निष्ठावान, कार्यतत्पर व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर नेहमी आघाडीवर असलेले समद कुरेशी यांची मलकापूर उपतालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक वर्गात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

समद कुरेशी हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष संघटनेत सक्रिय राहून सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. सामान्य माणसाच्या हक्काच्या लढ्यात ते नेहमी अग्रस्थानी राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे मलकापूर उपतालुक्यात शिवसेना (उबाटा गट) अधिक भक्कम होणार असल्याचा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

स्थानिक कार्यकर्त्यांनी फुलांचा वर्षाव करून त्यांचे जोरदार स्वागत केले. "जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवून संघर्ष करण्याची ताकद समद कुरेशी यांच्यात आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे उपतालुका पातळीवरील जनआंदोलन अधिक तीव्र होईल," असेही कार्यकर्त्यांनी सांगितले.

समद कुरेशी यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन 🌹🌹

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने