आज समाजवादी पक्षाच्या वतीने जळगाव जामोद नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना एक जोरदार निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्ट आदेशांचे उल्लंघन करून, सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली आणि लाचखोरीच्या जोरावर सन 2022 ची जुनी व चुकीची प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली, ही धक्कादायक बाब आम्ही निदर्शनास आणून दिली आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे प्रभाग रचना समितीचे प्रमुख व सदस्य यांनी सत्ताधाऱ्यांकडून आर्थिक लाभ स्वीकारून, शहरात प्रत्यक्ष फेरफटका न मारता जुनी रचना कायम ठेवली आहे. यामुळे निवडणूक आयोगाची फसवणूक झाली असून, लोकशाहीची थट्टा झाली आहे.
सन 2017 मध्येच या चुकीच्या प्रभाग रचनेविरोधात अनेक माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, तसेच विविध पक्षांनी आक्षेप घेतले होते. मात्र निवडणूक स्थगित झाल्याने त्यावर सुनावणी झाली नाही. आज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका होत असताना, पुन्हा एकदा जुनीच प्रभाग रचना कायम ठेवणे म्हणजे स्पष्टपणे जनतेचा आणि न्याय व्यवस्थेचा अपमान आहे.
➡️ समाजवादी पक्षाची जोरदार मागणी:
तीन दिवसात संबंधित प्रभाग रचना समिती प्रमुख व सदस्यांना निलंबित करावे.
अन्यथा समाजवादी पक्ष रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन छेडेल.
आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.
हा एक निव्वळ राजकीय षड्यंत्र असून, सत्ताधाऱ्यांनी आपली मते व सत्ता टिकवण्यासाठी लोकशाही मुल्यांची आणि नागरिकांच्या अधिकारांची गळचेपी केली आहे. समाजवादी पक्ष हा अन्याय सहन करणार नाही!
⏺ या आंदोलनात उपस्थित होते:
महाराष्ट्र प्रदेश सचिव लियाकत खान
जिल्हाध्यक्ष सैय्यद नफीस
तालुका अध्यक्ष मुश्ताक जमादार
रिजवान काझी,
शेकडो समाजवादी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते
🟥 आता थांबणार नाही – आता झुकणार नाही – अन्यायाविरुद्ध लढणारच!
– समाजवादी पार्टी, जळगाव जामोद
Tags
जलगाव जामोद