दिनांक: 28/06/2025
स्थळ: नांदुरा, जिल्हा बुलढाणा
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिनांक 26 जून 2025 रोजी बुलढाणा दौऱ्यात, माध्यमांशी बोलताना मुस्लीम समाजविरोधात उद्देशपूर्ण, द्वेष पसरवणारी आणि धार्मिक तणाव निर्माण करणारी वक्तव्ये केली. त्यांनी "रोहिंग्या", "बेकायदेशीर प्रमाणपत्र", आणि "देशद्रोह" अशा टोकाच्या शब्दांचा वापर करून संपूर्ण समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे.
यासोबतच, ते केवळ मशिदींमधील भोंग्यांवरच सातत्याने टीका करतात. इतर धर्मस्थळांवरील भोंग्यांविषयी ते का मौन बाळगतात? हे वक्तव्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचे आणि संविधानातील कलम 14, 21 व 25 चे सरळ उल्लंघन आहे.
समाजवादी पार्टीचा निषेध कार्यक्रम
या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने दिनांक 14 जुलै 2025 रोजी, तहसील कार्यालय नांदुरा येथे प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध व्यक्त केला जाणार आहे.
आमची मागणी:
1. कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करावा.
2. शांततेत होणाऱ्या कार्यक्रमासाठी कायदेशीर परवानगी द्यावी.
3. कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही भंग होणार नाही याची पूर्ण जबाबदारी समाजवादी पार्टी घेते.
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. मात्र, कोणताही नेता जर त्याचा वापर विशिष्ट समाजविरोधी विष पसरवण्यासाठी करत असेल, तर अशा प्रवृत्तींविरोधात आवाज उठवणे हीच खरी देशसेवा ठरते.
निवेदन देता वेळी, शेख नदीम अझर मिर्झा तोसीफ बिल्डर शाहीद कुरेशी शेख अजीम सय्याद खालीद आरीफ खान वसीम वाणी शेख समीर शेख इरफान व इतर समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते
– आझाद पठाण
युवा जिल्हाध्यक्ष, समाजवादी पार्टी – बुलढाणा जिल्हा
📞 8625892288
Tags
नांदुरा