चिंचोली येथे कॉंग्रेसला कंटाळून जितेंद्र जाधव यांचा समाजवादी पक्षात जाहीर प्रवेश

 चिंचोली येथील युवक कार्यकर्ते जितेंद्र जाधव यांनी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीला कंटाळून अखेर समाजवादी पक्षात जाहीर प्रवेश केला. समाजवादी पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष कृष्णा भैय्या रोचकरी यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला.
यावेळी बोलताना जितेंद्र जाधव यांनी सांगितले की, कॉंग्रेस पक्षामध्ये सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही, तसेच स्थानिक प्रश्नांबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या विचारसरणीने प्रेरित होऊन आणि गोरगरीब व सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी समाजवादी पक्षात प्रवेश करत आहे.
कृष्णा भैय्या रोचकरी यांनी जाधव यांचे पक्षात स्वागत करताना सांगितले की, समाजवादी पक्ष हा सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. युवकांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा. जितेंद्र जाधव यांच्या प्रवेशामुळे  समाजवादी पक्षाची ताकद आणखी वाढेल.
या वेळी समाजवादी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चिंचोली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जाधव यांच्या प्रवेशामुळे परिसरातील राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले आहे.
– शुभेच्छुक
आझाद पठाण
युवा जिल्हाध्यक्ष, समाजवादी पार्टी

إرسال تعليق

أحدث أقدم