लक्षवेधी समस्या नांदुरा शहरात दिवसा जड वाहतुकीला बंदी असूनही पोलीस विभागाच्या दुर्लक्षितेमुळे व्यापाऱ्यांची मनमानी


लक्षवेधी समस्या 
नांदुरा शहरात दिवसा जड वाहतुकीला बंदी असूनही पोलीस विभागाच्या दुर्लक्षितेमुळे व्यापाऱ्यांची मनमानी 
नांदुरा शहरात अरुंद रस्ते व गर्दीच्या ठिकाणी यामुळे गेल्या दीड दोन वर्षापासून नांदुरा शहरात दिवसाची जड वाहन वाहतुकीला प्रवेश बंदी असूनही शहरातील प्रमुख मार्गावर व अरुंद रस्त्यावर बाजारपेठेत दिवसाढवळ्या व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणावर जड वाहने अरुंद रस्त्यावर उभे करणे व शहरातील बेशिस्त मोटरसायकली ऑटो रिक्षा वाहतुकी व पैदल चालणारे नागरिकांची मोठ्या प्रमाणात कुचुंबना होत आहे ह्याकडे जबाबदार अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष असल्यामुळे तसेच राजकीय दबावापोटी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे त्यामुळे शहरात व्यापारी वर्गाची मोठ्या प्रमाणात मनमानी दिसून येत आहे यापूर्वी तत्कालीन ठाणेदार श्री विलासरावजी पाटील यांनी आदर युक्त भीती कायद्याची अंमलबजावणी केल्यामुळे फार मोठा वचक निर्माण झालेला होता अनेक दिवसाढवळ्या प्रवेश बंदी काळात दिवसा अनेक जड वाहनावर कारवाई करण्यात आलेले आहेत त्यामुळे
व्यापारी वर्गाचे धाबे दणाणले होते अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अशा चर्चा ऐकायला मिळत आहेत शहरातील कायदा व सुव्यवस्था नेहमीच अबाधित राहावे याबाबत शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य संपादक सुरेश दादा पेठकर यांनी वारंवार याबाबत वरिष्ठांना व आपल्या स्वाभिमानी शिव संदेश ह्या वृत्तपत्रातून या समस्येला जनतेच्या न्याय हक्कासाठी नेहमीच लढा देण्याचा कार्य केले आहे याकरिता या समस्येवर वरिष्ठांनी जबाबदार अधिकारी वर्गाने लक्ष देण्याचे गरज आहे

إرسال تعليق

أحدث أقدم