📰 नांदुरा तालुक्यात ‘लोक अदालत’ उपक्रमाचे आयोजन


नांदुरा (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी बुलढाणा डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून त्याअंतर्गत नांदुरा तहसील कार्यालयात दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी ‘लोक अदालत’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांच्या प्रलंबित महसुली प्रकरणांचे जलद व पारदर्शक निवारण करणे हा आहे. यामध्ये फेरफार, जमिनीच्या नोंदी, सातबारा उताऱ्याशी संबंधित समस्या तसेच विविध प्रशासकीय अडचणी आणि प्रलंबित अर्जांवर त्वरित कार्यवाही केली जाणार आहे.

तहसीलदार श्री. अजितराव जंगम यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह दिनांक २३ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात उपस्थित राहावे.

या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार असून प्रशासकीय कामकाजात सुलभता व पारदर्शकता येईल. हा उपक्रम ‘प्रशासन आपल्या दारी’ या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग ठरणार आहे.

👉 स्थळ – तहसील कार्यालय, नांदुरा
👉 दिनांक – २३ सप्टेंबर २०२५

إرسال تعليق

أحدث أقدم