नांदुरा पोलिसांची दडपशाही – लोकसभेत ‘जय फिलीस्तीन’ चालते, पण नांदुरात शेर लिहिला तर गुन्हा?



नांदुरा (प्रतिनिधी) – भारताच्या संसदेत मुस्लिम खासदार उभे राहून “जय जय फिलीस्तीन” अशी घोषणा करतात, तेव्हा कोणालाही आक्षेप नसतो. पण नांदुरा शहरातील एका बॅनरवर लिहिलेल्या शेरमध्ये फिलीस्तीन हा शब्द आला म्हणून पोलिसांना मध्यरात्री दोन वाजता फोन करून त्रास द्यायची गरज का वाटते? हा सरळसरळ दडपशाहीचा प्रकार असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुऱ्हाड मारण्याचा प्रयत्न आहे.

जश्ने ईद मिलादुन नबीच्या औचित्याने शहरात लावलेल्या बॅनरवर लिहिलेले शेर –

"तुम्हारी बहादुरी की कहानियाँ
सबके सामने बयाँ करता हूँ,
फ़िलस्तीन की माताओं और बहनों
तुम्हें दिल से सलाम करता हूँ।"

हा शेर इतका धारदार होता की पोलिस प्रशासनाला झोप उडाली. रात्री उशिरा फोन करून बॅनरवरील फिलीस्तीन शब्द काढायला भाग पाडणे, ही वागणूक नागरीकांना अपमानास्पद आणि अस्वीकार्य आहे.

दुहेरी निकषाचा सवाल

लोकसभेत फिलीस्तीनवरील घोषणांना संरक्षण, आणि नांदुरामध्ये शेर लिहिणाऱ्यांवर पोलिसांचा दबाव – ही दुहेरी वागणूक का?

संसद भवनात बोलले तर राष्ट्रहित,

पण छोट्या शहरात लिहिले तर गुन्हा?


हा सरळसरळ लोकशाहीचा अपमान आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे.

पोलिसांवर प्रश्नचिन्ह

नांदुरा पोलिस निरीक्षक साहेब, हा देश लोकशाही आहे की पोलीसशाही? कविता, शेर, विचार व्यक्त करणं हा गुन्हा नाही. मग एवढी भीती का? “फिलीस्तीन” या शब्दाला पोलिसांनी गुन्हा मानणं म्हणजे नागरिकांच्या भावनांचा अपमान आणि न्यायव्यवस्थेची खिल्ली उडवणं होय.

समाजवादी पार्टीची ठाम भूमिका

समाजवादी पार्टीचे स्थानिक नेते स्पष्ट सांगतात की – “संसदेत जर जय फिलीस्तीनचा नारा देता येतो, तर नांदुरात शेर लिहिणं कुणाच्याही  कायद्याप्रमाणे पोलीसांना रोखता येणार नाही. लोकशाहीचे हक्क आम्ही लढून घेऊ, दबाव सहन करणार नाही.”

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने