नांदुरा (प्रतिनिधी) –
नांदुरा नगर परिषद आवारात अनेक दिवसांपासून एका खाजगी गाडीवर “POLICE” अशी नेमप्लेट लावलेली दिसत होती. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रम व संताप निर्माण झाला होता की नगरपरिषद कार्यालय आहे की पोलीस स्टेशन?
👉 काय आहे प्रकरण?
मुख्याधिकारी नगरपरिषद नांदुरा यांनी त्यांच्या खासगी गाडीवर “POLICE” अशी नेमप्लेट लावून ठेवली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांचा पोलीस विभागाशी कोणताही संबंध नसल्यामुळे ही बाब थेट तोतया पोलीसगिरी म्हणून पाहिली जात होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर बोल आजाद न्यूजने ही गंभीर बाब उचलून धरली.
🚨 प्रशासनाचा घोर अपमान
पोलीस विभागाशी संबंध नसतानाही “POLICE” अशी पाटी वापरणे म्हणजे संपूर्ण पोलीस खात्याचा अपमानच असल्याचे नागरिकांचे मत आहे. ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिली गेली असली, तरी आजवर कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती.
⚡ बोल आजाद न्यूजची दखल – बदलली पाटी!
शेवटी नागरिकांच्या नाराजीला व माध्यमांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले. बोल आजाद न्यूजच्या बातमीची दखल घेत नांदुरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी त्यांच्या खाजगी गाडीवरील “POLICE” ही नेमप्लेट तात्काळ बदलली असून आता त्या गाडीवर “महाराष्ट्र शासन” अशी कायदेशीर नेमप्लेट लावण्यात आली आहे.
👉 या घटनेनंतर नागरिकांनी दिलासा व्यक्त करत प्रशासनाने नियमांचे पालन करून योग्य पाऊल उचलल्याचे स्वागत केले आहे.
📰 बोल आजाद न्यूज – जनतेच्या आवाजाला न्याय!
Tags
नांदुरा