धामणगाव बढे येथील मुस्लिम बांधवांकडून राष्ट्रपतींना निवेदन


धामणगाव बढे (ता. मोताळा, जि. बुलढाणा), दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी —
उत्तर प्रदेश राज्यामध्ये ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या शुभ निमित्ताने मुस्लिम समाजातील बांधवांनी “I Love Muhammad” चे बॅनर लावल्यामुळे स्थानिक पोलिसांनी अन्याय्य व बेकायदेशीर पद्धतीने अटक केलेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आज धामणगाव बढे येथील मुस्लिम समाजाने महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन दिले.
या निवेदनाद्वारे उत्तर प्रदेशातील संबंधित पोलीस अधिकारी तसेच या घटनेच्या मागे असलेल्या सर्व व्यक्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अटक केलेल्या मुस्लिम युवकांची त्वरित सुटका करण्यात यावी आणि भविष्यात धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येणार नाही याची संविधानिक हमी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आज दिलेल्या या निवेदनावर रफिक बुचर, अस्लम खान, शाहरुख खान आणि अ‍ॅड. वसीम कुरेशी यांची सही असून हे निवेदन धामणगाव बढे पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले.

إرسال تعليق

أحدث أقدم