मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाती सर्वच प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी लावणार, विविध विषयांवर बैठक संपन्न, नाशिक जिल्हा विशेष

 प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांबाबत आणि त्यावरील संभाव्य उपाययोजनांबाबत हॉटेल ट्रायडेंट, मुंबई येथे आज विशेष बैठक पार पडली. या बैठकीत अल्पसंख्यांक विकास मंत्री ना.ॲड. माणिकराव कोकाटे, समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, आमदार अबू आसीम आझमी आणि मार्टी कृती समिती तर्फे सीनियर रिसर्च स्कॉलर शहेबाज मनियार उपस्थित होते.  
या बैठकीत महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समुदायाच्या प्रमुख सर्वच समस्या प्राधान्याने सोडवण्याबाबत सखोल चर्चा झाली. मंत्री महोदयांनी सर्व प्रश्न नीट समजून घेतले आणि यावर तातडीने सकारात्मक कृती करण्याचे आश्वासन आणि संबंधितांना आदेश दिलेले आहेत. आमदार अबू आसीम आझमी यांच्या प्रयत्नांनी ही बैठक शक्य झाली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. 

मार्टी कृती समिती, महाराष्ट्र च्या वतीने ॲड. अझर पठाण, ॲड. शहेबाझ पठाण, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, कार्याध्यक्ष तथा, राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळ, संस्थापक अध्यक्ष जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, ॲड. वसीम कुरेशी आणि नबील उझ जमा हे सातत्याने विविध व्यासपीठावरून मुस्लिम अल्पसंख्यांक समुदायाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बैठक आयोजित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्याबद्दल त्यांचे देखील जाहीर आभार मानले आहेत..

إرسال تعليق

أحدث أقدم