📰 भावसार समाज नवरात्र महोत्सव अध्यक्षपदी जितेंद्र जुनगडे


नांदुरा (प्रतिनिधी) – नांदुरा  बुद्रुक भावसार समाज नवरात्र महोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी जितेंद्र यशवंत जुनगडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

शहरातील भावसार समाज मंदिरामध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत नवरात्र महोत्सवाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. बैठकीत समाज बांधवांच्या सहभागाने नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी विनोद अहिर, अनिकेत रंगदाळे सचिवपदी अखिलेश अंधारे सहसचिव सुरज सारंग,,  ,कोशाध्यक्षपदी..गोविंद खेते ,सह कोशाध्यक्षपदी..प्रसन्न नाफडे पुजारी अजय अहिर आकाश अंबेकर प्रसिद्धी प्रमुख प्रशांत श्रीराम ढवळे शुभम ढवळे सदस्यपदी स्वानंद गुजर अमित ढवळे रुपेश अंधारे अभिषेक नाफडे यांची निवड झाल्याचे कळविण्यात आले आहे

👉 सर्वानुमते निवड झालेल्या अध्यक्ष जितेंद्र जुनगाडे व नूतन कार्यकारिणीचे समाज बांधवांनी अभिनंदन केले असून, उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

إرسال تعليق

أحدث أقدم