ग्रामपंचायतीचे (नळ घर पट्टी) कर ५०% माफ करावेत – अ‍ॅड. वसीम कुरेशी यांची मुख्यमंत्रींकडे मागणी


धामणगाव बढे, ता. मोताळा, जि. बुलडाणा :
अत्यंत वाढती महागाई, रोजच्या जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडलेले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन जीवन कठीण झाले आहे, तर रोजगार व उत्पन्न कमी झाल्यामुळे शेतकरी वर्ग अक्षरशः हवालदिल झाला आहे.

या पार्श्वभूमीवर अ‍ॅड. वसीम कुरेशी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा ग्रामविकास मंत्री यांना निवेदन सादर करून ग्रामपंचायत करात ५० टक्के सवलत/माफी देण्याची मागणी केली आहे.

निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, आधीच लोकांवर महागाईचा प्रचंड भार असताना ग्रामपंचायतींकडून आकारला जाणारा कर हा ग्रामीण समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न ठरतो आहे. शेतकरी, शेतमजूर, लघुउद्योजक आणि गरीब घटकांना यातून मोठा आर्थिक फटका बसत असून त्यांना दिलासा मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे कर ५०% माफ करून ग्रामीण जनतेला जगण्यास दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागणीबाबत स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने