📰 बोला आज़ाद न्यूज | अपघाताची ताजी घटना 🚨 आमसरी हनुमान मंदिराजवळ टिप्पर व ट्रॅक्टरची भीषण धडक – दोन जण गंभीर जखमी

नांदुरा तालुक्यातील आमसरी गावाजवळील हनुमान मंदिर परिसरात
नांदुरा तालुक्यातील आमसरी गावाजवळील हनुमान मंदिर परिसरात


युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली

नांदुरा तालुक्यातील आमसरी गावाजवळील हनुमान मंदिर परिसरात आज सकाळी एक भीषण अपघात घडला. भरधाव टिप्पर आणि ट्रॅक्टरमध्ये जबर धडक होऊन दोन जण गंभीर जखमी झाले. या धडकेत ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जखमींना नांदुरा येथील रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले आहे.




अपघाताची माहिती मिळताच समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष मा. आझाद पठाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्तांची विचारपूस केली व जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिका व प्रशासनाशी संपर्क साधून सहकार्य केले.


मा. आझाद पठाण यांनी प्रशासनाकडे मागणी केली की,

➡️ या रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी

➡️ गतिरोधक, रस्ता दुरुस्ती व वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात.


बोला आज़ाद न्यूज कडून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, हीच प्रार्थना.

घटनास्थळी अजूनही पोलीस तपास सुरू असून, अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

إرسال تعليق

أحدث أقدم