🔷 धामणगाव बढे बस स्टँड परिसरात स्वच्छतागृहाची मागणी – अन्यथा आंदोलनाचा इशारा 🔷... अड वसीम कुरेशी

धामणगाव बढे (ता. मोताळा) – येथील ग्रामपंचायत सदस्य वसीम कुरेशी यांनी आज दिनांक 6/8/२०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालय, धामणगाव बढे येथे एक अधिकृत निवेदन सादर करत बसस्टँड परिसरात तातडीने सार्वजनिक स्वच्छतागृह व पब्लिक टॉयलेट उभारण्याची जोरदार मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, धामणगाव बढे बसस्टँड परिसर हा गावातील अत्यंत वर्दळीचा भाग असून दररोज शेकडो महिला, विद्यार्थी, व्यापारी व प्रवासी ये-जा करतात. मात्र, या परिसरात अजूनही सार्वजनिक स्वच्छतागृहाची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना गंभीर गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

विशेषतः महिलांना याचा फार मोठा त्रास होत असून, काही पुरुष उघड्यावर शौचविसर्जन करत असल्याने आरोग्य व स्वच्छता धोक्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात यापूर्वी ग्रामसभेत ठरावही मंजूर करण्यात आलेला असून त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:

धामणगाव बढे बसस्टँड परिसरात तातडीने स्वच्छतागृह / पब्लिक टॉयलेट उभारण्यात यावे.

ही सुविधा १५ दिवसांच्या आत कार्यान्वित करण्यात यावी.

अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.


हे निवेदन प्रति – गटविकास अधिकारी, पंचायत समिती मोताळा, तहसीलदार मोताळा, तसेच पोलीस निरीक्षक, पो.स्टे. धामणगाव बढे यांनाही सादर करण्यात आले आहे.

वसीम कुरेशी यांनी स्पष्ट केले की, "ही मागणी कोणत्याही राजकीय हेतूपोटी नसून गावातील सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य व प्रतिष्ठेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे."

ग्रामपंचायतीने या मागणीची तातडीने दखल घ्यावी, अशी ग्रामस्थांचीही एकमुखी मागणी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने