मेहकर (दि. १५ ऑगस्ट २०२५) –
महसूल विभाग व वन विभागाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. बागवान यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन, सामाजिक जाणीव जागृती आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित मान्यवर –
उपविभागीय अधिकारी मा. रवींद्र जोगी,
उपविभागीय पोलिस अधिकारी मा. प्रदीप पाटील,
तालुका दंडाधिकारी तहसीलदार मा. निलेश मळके,
नायब तहसीलदार मा. अजय पिंपरकर,
मेहकर पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवर
यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सन्मानानंतर आपल्या भावना व्यक्त करताना मोहम्मद राकिब बागवान म्हणाले –
"महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पेरणीतून आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेतून मला नेहमीच नवे बळ मिळाले आहे. या सन्मानाने माझ्या जबाबदाऱ्या अधिक वाढल्या असून येणाऱ्या काळात समाजासाठी नवे कार्य उभारण्याचा संकल्प करतो."
त्यांच्या या प्रेरणादायी शब्दांनी उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. समाजप्रबोधनाच्या कार्याला यानंतर अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
‘आवाज महाराष्ट्रचा’ आणि ‘साप्ताहिक अलौकिक बातमी’च्या वतीने मोहम्मद राकिब बागवान यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
Tags
मेहकर