नांदुरा:- नांदुरा वकील संघाची सन 2025-26 ची नूतन कार्यकारणी गठीत करणेबाबत दिनांक 14/8/2025 रोजी सर्व सन्माननीय सदस्य यांच्या समवेत वकील संघ नांदुराचे कार्यालयात बैठक होऊन ॲड श्री सुनिल के. जांगळे यांची नांदुरा वकील संघाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच नांदुरा वकील संघाचे जेष्ठ सदस्य सन्माननीय ॲड श्री सदानंद ब्राह्मणे यांची उपाध्यक्ष पदी आणि ॲड श्री राहुल मापारी यांची उपाध्यक्ष पदी निवड, ॲड श्री श्रीकांत देशमुख यांची सचिव पदी, आणि ॲड श्री सागर पी. जैन यांची कोषाध्यक्ष पदी तसेच ॲड रागिणी केदारे मॅडम यांची सहसचिव आणि ॲड सुनिल डी. इंगळे यांची सहकोषाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सदरच्या बैठकीमध्ये कार्यकारणी सदस्य म्हणून नांदुरा वकील संघातील तरुण आणि नविन चेहरे यांना समाविष्ट करण्यात आले असून ॲड. श्रीराम डी. गावंडे, ॲड एम. ए. राऊत, ॲड आसिफ ए. खान, ॲड नीता खंडारे मॅडम, ॲड. संदेश डी. इंगळे, ॲड जी. टी. व्यवहारे व ॲड सागर राठी व इतर यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली. सदर बैठकीमध्ये जेष्ठ विधीज्ञ ॲड श्री सी. एम. वाघ, ॲड बी.के. शेख, ॲड सुनिल बी. इंगळे, ॲड एस. व्हि. जुनगडे, ॲड अनिल सातपुतळे, ॲड विलास नाईक, ॲड निलेश वेरुळकर, ॲड अझहर खान,अॅड अमोल इंगळे, अॅड आर.बी सरोदे,अॅड अभिराज हिवराळे ,आणि इतर जेष्ठ सदस्यांनी मार्गदर्शन केले आणि उपस्थित सर्व नांदुरा वकील संघाच्या सन्माननीय सदस्यांनी सहकार्य केले.
Tags
नांदुरा