नांदुरा प्रतिनिधी:-
सभ्यता आणि संस्काराची सांगड घालून सुसंस्कारित बनले तर त्यांचे व देशाचे भवितव्य उज्वल होईल, असे प्रतिपादन गुरुदेव सेवाश्रम मंडळाचे संस्कारमूर्ती आदरणीय हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांनी नांदुरा येथील सर्वधर्मीय गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात केले.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा शेतकरी कन्या पुत्र शैक्षणिक विकास क्रांती संघटना व मराठा पाटील युवक समिती नांदुरा तर्फे दिनांक 13 जुलै रोजी नगर परिषद टाऊन हॉल येथे सर्वधर्मीय गुणवंत सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या कर्तुत्वाचा गौरव करणे व समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे हा या कार्यक्रमांमध्ये उद्देश आहे.दहावी व बारावी मधील विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसोबतच स्पर्धा परीक्षा, विविध विषयातील पीएचडी केलेल्या तसेच चार्टर्ड अकाउंटंट, नीट,सीईटी, एमपीएससी यूपीएससी या परीक्षामध्ये विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा यावेळी शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दहिगाव येथील जि प शाळेतील येथील विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने केली.विशेष सामाजिक दातृत्वाबद्दल सुभाष पेटकर,बंडू मुकुंद,प्रमोद खोंड यांचा सुद्धा आचार्य वेरूळकर गुरुजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा पाटील युवक समीचे संस्थापक अध्यक्ष श्री गजानन ढगे, मलकापूर तहसीलचे तहसीलदार राहुल तायडे, शेगाव ग्रामीण पो स्टे चे प्रवीण लिंगाडे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. गुणगौरव सोहळ्याला उपस्थित असलेले सौ प्रियंका काळे,श्री.शैलेश वट्टे, तहसिलदार नांदुरा, ज्ञानेश्वर ढोले,मंगेश राणे, रामकृष्ण कुटे,
त्र्यंबकराव तांगडे,संदिप निमकर्डे,डॉ.शरद पाटील,भगवान सोयस्कार,अमर पाटील,दिलीप कोल्हे,या सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना तसेच यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेचे संस्थापक अध्यक्ष राजेश गावंडे, मराठा पाटील युवक समितीचे मा. जिल्हाध्यक्ष छोटू पाटील,पंकज ठाकरे,अविनाश कुटे, प्रफुल बिचारे, श्याम मोरखडे, राहुल घाटे,विठ्ठल आवताडे,कपिल पाटील,अक्षय ढगे, प्रथमेश जुणारे, ऋषिकेश हिंगणे,अतुल गव्हाड,महेश पहुरकर,सतीश लांजुळकर,वैभव पारसकर, शंकर कोळस्कार, ज्ञानेश्वर मनस्कार, विष्णू बाठे,विजय आढाव रुपेश मुकुंद,शुभम चांभारे,अनिकेत भगत, छत्रपती धोरण, वैभव धांडे,ऋषिकेश अरवाडे,प्रकाश खंडागळे, बबलू धांडे, सचिन बाठे,वैभव खराटे, योगेश बाठे,सागर कोळस्कार, भगीरथ नमस्कार विशाल घोंगटे, विजय गावंडे, प्रशांत पाटील, अभिनव अढाव,ऍड सुधाकर दळवी,कोमल सचिन तायडे,प्रा वा वि भगत, लक्ष्मण वक्ते,पदमाकर ढोले,
अनंता देशमुख, नंदकिशोर खोंदील,
अनंता वडोदे, मधुकर तायडे,
अक्षय हेलेगे, रमा फाडके,
हिवरखेडे सर,योगेश लांडे,
स्वप्नील भगत,संजय कोल्हे,
बळीराम कोल्हे,सुरेश पाटील यांचे सह तालुक्यातील सर्व शाळातील विद्यार्थी,पालक,शिक्षक खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन उद्धव गावंडे सर तसेच प्रास्ताविक अक्षय बोचरे यांनी केले.
Tags
नांदुरा