नांदुरा शहरातील जुन्या इतिहासाची साक्ष पोळा वेस जतन व संरक्षण करण्याची नितांत आवश्यकता ज्येष्ठ पत्रकार सुरेशदादा पेठकर



नांदुरा शहरातील जुन्या इतिहासाची साक्ष असलेला जुम्मा मस्जिद जवळ नांदुरा नगरपालिकेच्या जुन्या इतिहासाची नोंद असलेली पोळावेस अत्यंत महत्त्वपूर्ण शहरातील प्रमुख मार्गावर नांदुरा शहरातील श्री गणेशा विसर्जन मिरवणूक श्री दुर्गास्व मिरवणूक मोहरम भगवान महावीर जयंती मिरवणूक मार्ग व शहरातील सर्व जाती धर्माच्या विविध प्रमुख मिरवणुका जाण्याच्या मार्गावर पोळा आहे या ठिकाणी शहरातील सर्वात मोठा हिंदूंचा पोळा बैलांचा सण भरत होता परंतु अलीकडच्या काळात बैलांची संख्या कमी झाल्यामुळे उत्सवाचे महत्त्व कमी झाले 
नांदुरा नगरपालिकेचे तत्कालीन लोकप्रिय तसेच लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष स्वर्गीय नारायण भाईजी गोरले यांनी सन १९५६ मध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये शहरात ऐतिहासिक वास्तू पोळावेस अत्यंत महत्त्वपूर्ण मुस्लिम बांधवांचे मोठे धार्मिक स्थळ जमा मस्जिद समोर उभारले गेल्या 70 वर्षाच्या काळात अद्याप पर्यंत होऊन गेलेले माजी लोकनियुक्त लोकप्रिय नगराध्यक्ष स्वर्गीय नारायण भाईजी गोरले व त्यांचे तत्कालीन नगरपालिकेचे लोकप्रतिथी नगरसेवक यांनी अद्वितीय ऐतिहासिक अशी पोळावेस ज्ञानगंगा नदीच्या पात्रालगत संरक्षण भिंतीचे मोठ्या प्रमाणात कोट बांधकाम केलेले त्यांच्या अतुलनीय व शहरासाठी केलेल्या भरीव कामगिरी व विकास कामे नांदुरा शहराच्या इतिहासात कोणीही नगराध्यक्ष करू शकला नाही याबाबत नांदुरा शहरवासी यांना गर्व व अभिमान आहे अशा शहरातील नामवंत ऐतिहासिक वास्तू आजच्या स्थितीत नष्ट होण्याच्या मार्गावर असून याची संरक्षण व निगा राखण्याचे संपूर्ण जबाबदारी नगरपालिका प्रशासनाचे आहे ही पोळावेस आजच्या स्थितीत अंतिम घोटीका मोजीत असून त्याची डागडुजी व दुरुस्ती करण्याचे जबाबदारी नगरपालिकेने घ्यावी जेणेकरून नांदुरा शहराच्या व नगरपालिकेच्या गौरवशाली इतिहासाची साथ असलेल्या पोळावेस जामा मस्जिद या परिसराचा विकास नगरपालिकेने करावा याबाबत नांदुरा नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी तथा मुख्याधिकारी साहेब यांनी या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा याबाबत नांदूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार सुरेशदादा पेटकर नांदुरा यांनी नांदुरा नगरपालिकेच्या प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा व पोळा वेस ऐतिहासिक साक्ष असलेल्या वास्तूचे जतन संगोपन व संरक्षण होणे शहरासाठी नितांत आवश्यक आहे अशी सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने सुरेश दादा पेठकर यांनी मागणी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने