✊ अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी लढणारा बुलंद आवाज, डॉ. शेरूभाई मोमीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी सर्वानुमते निवड!नाशिक |


📆 दिनांक : 18 जुलै 2025
📍 ठिकाण : शिवनेरी शासकीय विश्रामगृह, नाशिक
🗯️ "शासनाचे डोळे उघडणारी घोषणा!"
राज्याच्या, नव्हे तर देशाच्या पातळीवर अल्पसंख्यांक समाजाच्या हक्कांसाठी सडेतोडपणे लढणाऱ्या कौमे खिदमत सोशल फाउंडेशनचे संस्थापक, “आदर्श महाराष्ट्र युवा भूषण” पुरस्कार प्राप्त जनसेवक मा. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन यांची राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळाच्या अध्यक्षपदी एकमुखी निवड जाहीर करण्यात आली आहे.
नाशिक येथील शिवनेरी शासकीय विश्रामगृहात, राज्यभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर झाली. ही निवड ही केवळ औपचारिक निवड नाही, तर हा सरकार व प्रशासनाला दिलेला स्पष्ट इशारा आहे की – “आता गोरगरिबांच्या, अल्पसंख्यांकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास गप्प बसणार नाही!”
🛑 पदाधिकारी नव्हे तर हक्काच्या लढवय्यांची फौज जाहीर!
प्रचंड प्रतिसादात मंडळाची जंबो कार्यकारिणी घोषित करण्यात आली, ज्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो कार्यकर्त्यांचा प्रतिनिधित्व करण्यात आले आहे.
🔻 मुख्य पदाधिकारी :
उपाध्यक्ष – समीरभाई सैय्यद, सिद्धीक अन्सारी, ईब्राहिम अत्तार, अल्ताफ पठाण, मोबीन मुलतानी, आदम मोमीन, आश्रफ मोमीन, सलीम मुलतानी, हुसेन अन्सारी, इंजि. तलतभाई शेख, सलीम सैय्यद, अकबर अन्सारी, ऐकबाल अन्सारी, ईम्रान अन्सारी, परवेज शेख, मुक्तारबाबा देशमुख
सरचिटणीस – बाबा शेख
सहचिटणीस – आरिफ शेख, सलीम शेख, आमीन शाह, मजहर शेख
चिटणीस – अब्दुलदादा शेख
कार्याध्यक्ष – भाई समीर खान
सल्लागार – खालेद नाहदी, हसणमियाँ शेख, अ. रशीदबाबा शेख, मुसा खान, आरिफ सौदागर, उबेद अन्सारी, अ.हमीदबाबा अन्सारी
💥 "हे केवळ पद नाही, हक्कांसाठीचा एल्गार आहे!"

डॉ. शेरूभाई मोमीन यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारिणी आजच्या राजकारणात गोंधळलेल्या वंचित समाजासाठी आशेचा किरण ठरेल. झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी ही कार्यकारिणी पुढच्या काळात मोर्चे, आंदोलन, प्रश्नपत्रिका, RTI आणि न्यायालयीन लढाईसह पूर्ण आक्रमक धोरणाने काम करणार आहे.
🧨 “हा हक्काचा लढा आहे – भीक नको, अधिकार पाहिजे!”
सरकारला यापुढे गोरगरीबांच्या प्रश्नांपासून दुर्लक्ष करण्याची मुभा दिली जाणार नाही. प्रत्येक अल्पसंख्य समाजबांधवाच्या समस्या शासन दरबारी पोहचवून, उत्तर न मिळाल्यास रस्त्यावर उतरून उत्तर मिळवलं जाईल – असा निर्धार राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शेरूभाई मोमीन यांनी यावेळी व्यक्त केला.

إرسال تعليق

أحدث أقدم