आगामी न.प. निवडणुकीत आझाद पठाण यांना प्रचंड जनसमर्थनपहिल्याच प्रयत्नात समाजवादी पार्टीकडून दमदार दावेदारी!✍️ युवा जिल्हाध्यक्ष – समाजवादी पार्टी, नांदुरा

नांदुरा – नगर परिषद निवडणुकांची रणधुमाळी रंगत असतानाच, समाजवादी पार्टीकडून पहिल्यांदाच नांदुरा नगर परिषद निवडणुकीत उतरण्याची अधिकृत तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकीत पक्षाचे युवा चेहरा आझाद पठाण यांना प्रचंड जनसमर्थन लाभत असून, त्यांचे नाव प्रबळ इच्छुक म्हणून पुढे येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून आझाद पठाण यांनी नांदुरा शहरातील नागरी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यांची दुरवस्था, कचरा व्यवस्थापन, नागरी सुविधा यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी वेळोवेळी प्रशासनाला खडसावले आहे. या ठोस कार्यपद्धतीमुळे जनतेत त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाविषयी विश्वास वाढला आहे.

त्यांचा राजकीय प्रामाणिकपणा, तळमळीने लढण्याची वृत्ती, तरुणांमध्ये असलेली लोकप्रियता, सर्व समाजघटकांशी थेट संवाद यामुळे आझाद पठाण हे नाव जनतेत चर्चेचा विषय बनले आहे.

नांदुरा शहरातील व्यापारी वर्ग, तरुण संघटना, महिला मंडळे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेतृत्वाला भरभरून पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे समाजवादी पार्टीकडून पहिल्याच निवडणुकीत, आझाद पठाण यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळेल, अशीच जोरदार चर्चा नांदुरा शहरात पाहायला मिळत आहे.

إرسال تعليق

أحدث أقدم