येवला येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, गोर-गरिबांच्या हक्कासाठी आवाज उठवणारे, अन्याय-अत्याचार व भ्रष्टाचाराविरोधात नेहमी लढा देणारे, "राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळाचे" संस्थापक अध्यक्ष म्हणून नुकतीच निवड झालेले मा. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन यांचा गौरव सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी सत्कार करताना मा. जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सभापती, नाशिक जिल्हा, लोकनेते, प्रसिद्ध उद्योगपती व आदर्श कार्यसम्राट मा. श्री. महेंद्रकुमार (काका) काले साहेब उपस्थित होते. त्यांच्यासोबत युवा नेते मा. अभिजित भैय्या काले, युवा नेते मा. दर्शनभैय्या काले, पिंटूभाऊ खामकर, तसेच अनेक सदस्य, पदाधिकारी, हितचिंतक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. शेरूभाई मोमीन हे स्वाभिमानी सेना, महाराष्ट्र मुस्लिम महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष, तसेच आदर्श युवा कार्यसम्राट म्हणून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून, त्यांच्या निवडीमुळे समाजामध्ये समाधानाचे वातावरण आहे.
संपर्कासाठी:
मा. श्री. महेंद्रकुमार काले सोशल फाउंडेशन, येवला
आपले मन:पूर्वक अभिनंदन...!
"एकमेव लढा... अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचाराविरोधात"
Tags
यवला