धामणगाव बढे, ता. मोताळा, जि. बुलढाणा | प्रतिनिधी
धामणगाव बढे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी शासनाच्या निधीतून आलेल्या कचरा संकलन कुंड्या dust bean वाटप गेली दोन वर्षे केवळ कागदोपत्रीच दाखवले जात होते. प्रत्यक्षात गावातील लाभार्थ्यांना कोणतीही किंडी मिळालेली नव्हती. ही बाब सामाजिक कार्यकर्ते अॅड. वसीम शेख कुरेशी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी “आपले सरकार तक्रार प्रणाली”वर संबंधित गैरप्रकाराविरोधात तक्रार दाखल केली होती (टिपण क्रमांक DIV/RDDE/AURN/2025/188).
तक्रारीनंतर ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित कचरा कुंड्या प्रत्यक्ष वाटप सुरू केले आहे. सदर तक्रारीत अॅड. कुरेशी यांनी स्पष्ट केले होते की, दोन वर्षांपूर्वी शासन निधीमधून ग्रामपंचायतीला कचरा संकलनासाठी किंड्या मिळाल्या होत्या. मात्र त्या वस्तू केवळ कागदावर दाखवून ठेवण्यात आल्या होत्या आणि कोणत्याही नागरिकाला वाटप करण्यात आले नव्हते.
ग्रामपंचायत प्रशासनाने झालेल्या त्रुटीची दखल घेत वस्तूंचे प्रत्यक्ष वाटप केले असून, गावकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या यशस्वी कारवाईबद्दल अॅड. वसीम कुरेशी यांनी म्हटले की, "सरकारी योजना जर पारदर्शकतेने राबवल्या गेल्या, तर प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतात. दोन वर्षांपासून बंदिस्त ठेवलेल्या वस्तू लोकांच्या हातात देण्यासाठी केलेला संघर्ष आज फळाला आला आहे."
Tags
धामणगाव मोतळा