**निवेदनाचा प्रभाव : समाजवादी पार्टीच्या निवेदनानंतर नगर परिषदेने सफाई मोहीम सुरू केली!*

शेगाव | काल समाजवादी पार्टीच्या शेगाव शहराध्यक्ष शेख रफिक यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद शेगाव यांना निवेदन देत ईदगाह परिसर, पाजवा, टिपू सुलतान चौक तसेच शहरातील विविध भागांतील स्वच्छतेसंदर्भात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती.

या निवेदनाचा त्वरित परिणाम दिसून आला असून आज नगर परिषदेने संबंधित परिसरात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. ईदगाह परिसर, टिपू सुलतान चौक आणि शहरातील इतर भागांमध्ये कचरा उचलणे, नाल्यांची सफाई, रस्त्यांवरील घाण काढणे अशा कामांना सुरूवात करण्यात आली आहे.

शहरातील नागरिकांकडून समाजवादी पार्टीच्या या तत्परतेचे कौतुक होत असून, प्रशासनानेही जनतेच्या समस्यांकडे वेळेवर लक्ष दिल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे

إرسال تعليق

أحدث أقدم