समाजवादी पार्टी शेगाव
दिनांक : १५/०७/२०२५
शेगाव (प्रतिनिधी) –
समाजवादी पार्टी शेगाव शहराचे अध्यक्ष शेख रफिक शेख रऊफ यांनी दिनांक १५ जुलै २०२५ रोजी शेगाव नगर परिषदेला निवेदन सादर करून शहरातील वाढती अस्वच्छता, चोकांमधील साचलेले पाणी, उघडे गटार व खराब रस्ते याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
या निवेदनात त्यांनी नमूद केले की, ईदगाह प्लॉट, पजावा, टीपू सुलतान चौक आणि अन्य परिसरांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे व नाल्यांत साचलेले सांडपाणी नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे.
त्यांनी प्रशासनाकडे पुढील तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
1. संपूर्ण शहरात विशेषतः वारंवार तक्रार असलेल्या परिसरात स्वच्छता मोहिम तातडीने राबवावी.
2. नाल्यांची त्वरित सफाई करावी.
3. रस्त्यांवर जेथे खड्डे आहेत, तेथे तात्काळ रस्त्यांची डागडुजी करावी.
शेख रफिक शेख रऊफ यांनी स्पष्ट केले की, प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरीत उपाययोजना करावी, अन्यथा जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ शकतो.
Tags
शेगांव