सावरगाव नेहु ता,नादुरा मधील युवक संदिग्धरीत्या बेपत्ता – नांदुरा पोलिसांकडून शोध सुरू



नांदुरा, दिनांक 11 जुलै 2025 –
तालुक्यातील सावरगाव नेहु नगर येथील संजय समाधान खंडारे वय अंदाजे 30 वर्ष, हे दिनांक 05/07/2025 रोजी सायंकाळी 03:00 वाजेपासून आपल्या घरी कोणालाही काही न सांगता बाहेर पडले असून, त्यानंतर अद्यापपर्यंत परतलेले नाहीत.
पत्नी सौ. वंदना संजय खंडारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पो.स्टे. नांदुरा येथे मिसिंग क्रमांक 34/2025 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गायब व्यक्तीची माहिती:
नाव: संजय समाधान खंडारे
वय: 30 वर्षे
राहणार: सावरगाव नेहु नांदुरा, जि. बुलढाणा
उंची: अंदाजे ५ फूट
वर्ण: सावळा
अंगावरचे कपडे: पिवळसर रंगाचा शर्ट, भूरे रंगाची जिन्स पँट, काळ्या रंगाची स्लीपर
चेहरा: रेखीव, केस कुरळे
नातेवाईक व पोलिसांकडून परिसरात शोध घेतला जात असून अद्याप काहीही माहिती उपलब्ध झालेली नाही.
कृपया नागरिकांना विनंती आहे की, वरील वर्णनाचा व्यक्ती कोठेही दिसल्यास तात्काळ पोलीस स्टेशन, नांदुरा येथे संपर्क साधावा.
📞 संपर्क: पो.स्टे. नांदुरा – 07265-220229
📱 पीएसआय अमोल खोपडे – 9822565513
– पोलीस स्टेशन, नांदुरा
जि. बुलढाणा

إرسال تعليق

أحدث أقدم