समद कुरेशी यांची अल्पसंख्याक विकास मंडळ बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती – समाजवादी पार्टीतर्फे अभिनंदन



नांदुरा, दिनांक: 19 जून 2025

समाजसेवक समद नजीर कुरेशी यांची अल्पसंख्याक विकास मंडळ, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल समाजवादी पार्टी तर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रदेश अध्यक्ष शौएब आसिफ खाटीक यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि योगदानाचा गौरव करत ही जबाबदारी एक वर्षासाठी त्यांच्यावर सोपवली आहे. समद कुरेशी हे अनेक वर्षांपासून अल्पसंख्याक समाजासाठी झटत असून, त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आपली भूमिका समर्थपणे बजावली आहे.

या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांना नवीन दिशा मिळेल, असा विश्वास समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी व्यक्त केला आहे.

समाजवादी पार्टी – बुलढाणा जिल्हा समद कुरेशी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे.


संपर्क:
आझाद पठाण
युवा जिल्हाध्यक्ष, समाजवादी पार्टी – बुलढाणा जिल्हा
रा. गांधी चौक, नांदुरा




إرسال تعليق

أحدث أقدم