:-ग्रामपंचायत सदस्य व गावकरी, येरळी
महोदय,
जिगांव प्रकल्प अंतर्गत बाधित होणाऱ्या मौजे येरळी टप्पा क्र.। चे पुर्नवसित गावठाण मौजे निमगांव ता. नांदुरा जि. बुलडाणा येथील विविध नागरी सुविधांचे बांधकाम करण्याचे कामाचा कंत्राट करारनामा क्र.ब. 107 विका 2023/24 अन्वये देण्यात आले आहे. कामाचा कालावधी 18 महिने असुन कार्यारंभ आदेश क्र. 2807 नि.ली.ले.प. 1/23 दि. 02/11/2024 ला दिला आहे. परंतु कंत्राटदार बोरसे ब्रदर्स यांनी सदर काम एका गावठी सब कंत्राटदाराकडे वर्ग केले आहे. सदर सब कंत्राटदाराच्या कामाचा दर्जा निकुष्ठ असुन या अगोदर याच सब कंत्राटदाराने केलेले बांधकाम संबंधित अधिकारी व गावकरी यांनी काढुन टाकले आहे. त्या कामाचे व्हीडीओ फोटो आमच्याकडे उपलब्ध आहे. परंतु पुन्हा त्याच बोगस कंत्राटदाराची बोरसे ब्रदर्स व संबंधित अधिकारी यांनी नेमणुक केली असुन ते एक प्रकारे शासनाची फसवणुक करीत आहे.
तरी मुख्य कंत्राटदार बोरसे यांचेवर कार्यवाही करण्यात यावी. सदर काम निकृष्ठ दर्जाच्या त्याच बोगस सब कंत्राटदाराकडुन होत असुन भविष्यात शाळा, समाज मंदिर, ग्रामपंचायत भवनात काही जिवीत हानी झाल्यास त्याला कंत्राटदार बोरसे व संबंधित अधिकारी वर्ग जबाबदार राहतील. अन्यथा जोपर्यंत कंत्राटदार बोरसे स्वतः काम करीत नाही व त्याची गावकऱ्यांना खात्री/ हमीपत्र देत नाही तोपर्यंत काम बंद करण्यात यावे.सदर प्रकरणात सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी मा. आमदार संचेती साहेब, व बुलडाणा पालक मंत्री व मदत व पुर्नवसन मंत्री, मा.ना. मकरंद जाधव साहेब, यांची भेट घेतली असता त्यांनी सुध्दा संबंधित अधिकाऱ्यांना सदर कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची सुचना दिली. परंतु चिरीमिरी घेऊन मथुर झालेले अधिकारी वर्ग यांनी कोणत्याच प्रकारची कार्यवाही केली नाही. म्हणून प्रा.प सदस्य व गावकरी यांनी दि. 19/6/2025 पसुन उपोषणाचा मार्ग अवलंबत आहे.
दिनांक : 19/06/2025
ठिकाण : नविन पूर्ववसित गावठाण येरळी. ......गावासाठी काही पण करायला तयार आहे . आज पहिल्याच दिवशी नांदुरा तहसीलदार साहेब यांनी उपोषणाला भेट दिली व नवीन गावठाण बांधकाम यांचा पंचनामा केला.
Tags
यरली ता नांदुरा