स्थान: मलकापूर, जिला बुलढाणाशहर की ज्वलंत समस्याओं पर ध्यान नहीं तो होगा तीव्र आंदोलन – डानिस शेख एमआयएम जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन

दिनांक: 20 जून 2024


मलकापूर शहरात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना रस्ते, गटारी, व स्वच्छतेच्या प्रश्नांनी त्रस्त व्हावे लागत आहे. मुस्लिम बहुल भागांमध्ये मस्जिद, मदरसे, शाळा परिसरात साचलेल्या पाण्यामुळे व घाणीतून दुर्गंधी निर्माण होत असून, नागरिक, विद्यार्थी व महिला यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर दिनांक 20 जून 2025 रोजी डानिस शेख, एमआयएम जिल्हाध्यक्ष, बुलढाणा यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळाने मा. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. यामध्ये पुढील मागण्या मांडण्यात आल्या:

1. साचलेले पाणी तात्काळ उपसावे.


2. गटारी व नाल्यांची साफसफाई तातडीने करावी.


3. प्रमुख रस्त्यांची डागडुजी व डांबरीकरण करावे.


4. मदरसे, शाळा, मस्जिद परिसरात स्वच्छतेची व फॉगिंगची व्यवस्था करावी.


5. उघड्या गटारांना झाकण बसवावीत.


6. सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात यावी.


7. ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी योग्य ती वाहतूक व्यवस्था करावी.


8. नगरपरिषद कर्मचारी वेळेवर व नियमित काम करत आहेत का, याची तपासणी करावी.


9. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांपासून बचावासाठी औषध फवारणी करण्यात यावी.


10. सर्व कामांवर योग्य देखरेख ठेवावी आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.

जर प्रशासनाने 10 दिवसांच्या आत कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही, तर दिनांक 1 जुलै 2025 पासून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

या निवेदनावर स्थानिक समाजसेवक, नगरसेवक, आणि युवकांनी स्वाक्षऱ्या करून पाठिंबा दर्शविला आहे.




संपर्क:
डानिस शेख
जिल्हाध्यक्ष, एमआयएम, बुलढाणा. मलकापूर (शहर)

إرسال تعليق

أحدث أقدم