नांदुरा तालुका क्रीडा संकुल गेली आठ वर्षांपूर्वीपासून नांदुरा शहरातील दूध डेरी मार्गावर प्रशस्त असे काम मलकापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री चैनसुख संचेती यांच्या अंतर्गत कोट्यावधी रुपयाचा निधी शासनाकडून मंजूर करून काम सुरू आहे अद्याप पर्यंत काम पूर्ण झालेले नाही त्या ठिकाणी नांदुरा तालुका क्रीडा अधिकारी यांच्या मन मर्जी व लोकप्रतिनिधी यांचे मुळे शासनाच्या लाखो रुपयांचा निधी आपल्या मनमर्जी पणामुळे खरेदी करून तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे
तालुका क्रीडा संकुलाचे काम अर्धवट असताना त्या ठिकाणी तालुका क्रीडा अधिकारी व तहसीलदार नांदुरा यांनी संगमने त्या ठिकाणी दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी थातूरमातूर पद्धतीने काही खेळाडूंचे सत्कार मलकापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री चैनसुख जी संचेती यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले विद्यमान आमदार संचेती हे सुद्धा त्यांच्या शालेय जीवनात कुस्ती क्षेत्रामध्ये नावलौकिक व खेळाडू असल्यामुळे त्या ठिकाणी सत्कार करण्यात आले परंतु त्या ठिकाणी नांदुरा शहरातील व तालुक्यातील व शहरातील अनेक प्रतिभावान खेळाडू सन्मान पासून वंचित राहिलेले आहे याबाबत नांदुरा तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुरेश दादा पेठकर यांनी याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी श्री महानकर यांच्याकडे याबाबत माहिती मागितली असता अद्यापपर्यंत ते माहिती देऊ शकले नाहीत या ठिकाणी तालुका क्रीडा अधिकारी यांच्या बेजबाबदार व दुरुस्तीमुळे व त्यांच्या मनमर्जी कारभारामुळे शासनाच्या लाखो रुपयाचा निधी नष्ट होण्याच्या मार्गावर व नष्ट झालेला आहे याची दखल घेणे गरजेचे आहे या ठिकाणी नांदुरा तालुक्यातील शहरातील अनेक प्रतिभावान खेळाडू राज्यस्तरावर विदर्भ स्तरावर जाऊ शकत नाहीत याचे मुख्य कारण तालुका क्रीडा संकुल बांधकाम पूर्ण होत नसल्यास व तसेच त्या ठिकाणी कोणत्याही खेळाडूंसाठी सुख सोयी व सुविधा नसल्यामुळे त्याचा अभाव फार मोठ्या प्रमाणामध्ये नांदुरा तालुक्यात खेळाडूवर होत आहेत यासाठी मलकापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री चैनसुख जी संचेती मलकापूर यांनी याची दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे लवकरात लवकर तालुका क्रीडा संकुलाचा शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्राप्त करून त्या ठिकाणी तालुक्यातील शहरातील विद्यार्थी व प्रतिभावान खेळाडू जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी नांदुरा शहरातील नेहमीच सर्व सामान्य समस्यांना वाचा फोडणारे व सर्व सामान्य लोकांच्या हिताच्या व शहरातील तालुक्यातील प्रतिभावान खेळाडू च्या वतीने नांदुरा तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार सुरेशदादा पेटकर यांनी याबाबत जिल्हाधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी व मलकापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार यांना नम्र आवाहन केले आहे
Tags
नांदुरा