आज दिनांक 15 जून 2025 रोजी दिल्ली येथे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मा. महासचिव व राज्यसभा खासदार मा. श्री. मुकुलजी वासनिक साहेब यांची सौजन्यभेट झाली.
या भेटीदरम्यान, मा. वासनिक साहेबांनी माझ्या मुलगा शादाब खान याला उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याच्या निमित्ताने दूरध्वनीद्वारे मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. साहेब व त्यांच्या सौ. वाहिनींचे प्रेमळ स्वागत आणि आग्रहाने केलेल्या चहा-पाण्यासोबत आम्ही जवळपास अर्धा तास विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
मा. साहेबांची ही आत्मीयता, वेळ देणे आणि शुभेच्छांचा हा स्नेहभाव आम्हा कुटुंबासाठी अत्यंत प्रेरणादायक आणि स्मरणीय ठरला.
Tags
मलकापूर