राखोंडेपुरा व आठवडी बाजार परिसरात रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा करणाऱ्या डी.पी. (Distribution Point) ला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच मा. नगरसेवक श्री. लाला भाऊ इंगळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्वतः फायर ब्रिगेडच्या वाहनासह घटनास्थळी हजेरी लावत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले.
आग विझवण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून तत्काळ उपाययोजना राबवण्यात आल्या. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना लाला भाऊ इंगळे यांनी त्यांचे सांत्वन करून शांतता राखण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी माजी नगरसेवक श्री. लाला भाऊ इंगळे यांनी सांगितले, "जनतेच्या सहकार्यानेच विकासकामांना गती मिळते. नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. आगामी काळातही सार्वजनिक सुविधांचा विकास आणि नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
या घटनेनंतर परिसरातील विद्युत यंत्रणेची तात्काळ तपासणी करण्यात येणार असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Tags
नांदुरा