राखोंडेपुरा व आठवडी बाजार परिसरातील डीपी संबंधित विविध समस्या आणि प्रश्नांवर यशस्वीरीत्या तोडगा काढण्यात आला असून, हे कार्य मा. नगरसेवक तथा भाजपा नेते श्री. सुधीरभाऊ मुऱ्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
या विकासकार्यावेळी भाजपा शहराध्यक्ष श्री. प्रमोद हिवाळे, ब्रह्मानंद चौधरी, गणेश राखोंडे, अक्षय घन, अनिलभाऊ इंगळे, संजय गावत्रे, वैभव सनिसे, सोनू राखोंडे, कृष्णा पिंपरे आदी मान्यवर तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी श्री. सुधीरभाऊ मुऱ्हेकर म्हणाले, "जनतेच्या सहकार्यानेच विकासकामांना गती मिळते. नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. आगामी काळातही सार्वजनिक सुविधांचा विकास आणि नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी कटिबद्ध राहू."
यावेळी नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्व मान्यवरांनी आभार व्यक्त केले आणि पुढीलही सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
Tags
नांदुरा