स्थळ: नांदुरामहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात शिवसेनेचा तीव्र निषेधनांदुरा

दिनांक: १६/०६/२०१३
 शहरात आणि परिसरात महावितरण कंपनीकडून सातत्याने नागरिकांना विजेच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. वारंवार लाईट बंद होणे, वीज पुरवठ्यात अनियमितता, तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता तासन्‌तास वीजपुरवठा खंडित होणे या बाबींमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

शिवसेना शहरप्रमुख श्री. अनिल कैलास जांगळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयात निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. ऑफिसचे लँडलाईन सतत बंद असते, मोबाईलवर संपर्क होण्याचा प्रयत्न केल्यास तो देखील अपयशी ठरतो.
अलीकडेच नांदुरा शहरातील खेळवाडी भागात एका १० वर्षाच्या मुलाला उघड्या विजेच्या तारेचा शॉक लागून गंभीर इजा झाल्याची घटना घडली. तरीदेखील महावितरणने कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे.

शिवसेनेच्या वतीने मागणी करण्यात आली की:

तातडीने महावितरण कंपनीने योग्य कारवाई करावी.

नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

लँडलाईन आणि मोबाईल सेवा कार्यरत ठेवाव्यात.

शहरात विजेच्या सुरळीत पुरवठ्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.


अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा शहरप्रमुख अनिल जांगळे आणि राम भाऊ झांबरे व सहकाऱ्यांनी दिला आहे.

إرسال تعليق

أحدث أقدم