ब्रेकिंग न्यूज | आजाद न्यूज 🚨
बुलढाणा जिल्ह्यातील चर्चित कळमेकर कथित हत्याकांड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मोठी प्रशासकीय घडामोड झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुन्हे शाखा प्रमुख अबुलकर साहेब तसेच जळगाव जामोद पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.
या बदल्यांचा आणि कळमेकर प्रकरणाचा थेट संबंध आहे का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र या घडामोडीमुळे जिल्ह्यात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून नागरिकांमध्येही उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, संबंधित विभागाकडून अधिकृत आदेश किंवा स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
आजाद न्यूज या प्रकरणावर लक्ष ठेवून असून अधिकृत माहिती मिळताच पुढील अपडेट देण्यात येईल.
– आजाद न्यूज 📺
"सत्यासाठी निर्भीड पत्रकारिता"
Tags
बुलढाणा