नांदुरा (प्रतिनिधी) : मागील आठवड्यात नांदुरा तहसील कार्यालयात झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे संपूर्ण कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या घटनेत जखमी झालेले जंगम सर यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने कार्यालयाच्या कामकाजाची संपूर्ण जबाबदारी प्रभारी तहसीलदार वक्ते साहेब यांच्या खांद्यावर आली.
अशा प्रतिकूल परिस्थितीतही राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देत, सर्व दुःख बाजूला ठेवून नांदुरा तहसील कार्यालयातील कामकाज सुरळीतपणे सुरू ठेवण्यात आले. याच कर्तव्यभावनेचे दर्शन आज १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त पाहायला मिळाले.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नांदुरा तहसील कार्यालयात प्रभारी तहसीलदार वक्ते साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कठीण प्रसंगातही दाखवलेली जिद्द, कर्तव्यनिष्ठा आणि प्रशासनाची जबाबदारी यामुळे हा कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला.
या प्रसंगी उपस्थितांनी एकमताने सांगितले की, संकट कितीही मोठे असले तरी शासन यंत्रणा आपल्या कर्तव्यापासून मागे हटत नाही, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.
Tags
नांदुरा