नांदुरा पोलीस ठाण्यात कार्यरत PSI विरुद्ध NCR दाखल; स्टेशन डायरीत आरोपी म्हणून नोंद


नांदुरा (बुलढाणा):
नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या मारहाण प्रकरणात महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली असून, नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असलेल्या PSI अधिकाऱ्याविरुद्ध NCR दाखल करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणाची नोंद नांदुरा पोलीस स्टेशन डायरीत आरोपी म्हणून अधिकृतरीत्या करण्यात आली आहे.
दि. 27 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 4.40 वाजता घडलेल्या या घटनेप्रकरणी NCR क्रमांक 46/2026 अन्वये BNS कलम 115(2) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदार गोपाल राधेश्याम नालट (वय 31), व्यवसाय मजुरी, रा. नांदुरा खुर्द, ता. नांदुरा, जि. बुलढाणा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वादाच्या कारणावरून आरोपी PSI यांनी शिवीगाळ करून थपडा व धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने घटनेचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर मारहाण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस प्रशासनाने तक्रार नोंदवून घेतली असून, संबंधित PSI अधिकाऱ्याची नोंद आरोपी म्हणून स्टेशन डायरीत करण्यात आली आहे.
या प्रकरणात आरोपीस कलम 642 नुसार नोटीस देण्यात आली असून, तक्रारदारास पुढील कायदेशीर प्रक्रियेबाबत व न्यायालयात दाद मागण्याबाबत समज देण्यात आली आहे.
कायद्याचे रक्षक असलेल्या अधिकाऱ्याविरुद्धच कायदेशीर नोंद होणे, हे न्याय आणि पारदर्शकतेचे उदाहरण मानले जात असून, “कायदा सर्वांसाठी समान” हा संदेश समाजात पोहोचत आहे.

إرسال تعليق

أحدث أقدم