निष्ठेचा घात : फिरोज खानच्या समर्थनाचा अपमान करणाऱ्यांसाठी कडवा इशारा


फिरोज खानच्या समर्थनाला रडवणारे आज सत्तेच्या मस्तीत मिरवत आहेत. निष्ठा, संघर्ष आणि प्रामाणिकपणा यांची खिल्ली उडवून तुम्ही स्वतःला मोठे समजत असाल, तर हा तुमचा भ्रम आहे. इतिहास शांत असतो, पण स्मरणशक्ती भयंकर असते.
ज्यांनी रक्त आटवून पक्षासाठी झटले, त्यांनाच डावलून संधीसाधूंना पुढे केले गेले. ही राजकारणाची नाही, तर नालायकपणाची परिसीमा आहे. आज फिरोज खानच्या समर्थनाला कमी लेखणारे लक्षात ठेवा—अन्यायाची चिठ्ठी फार काळ लपून राहत नाही.
ज्यादिवशी सत्य उघडं पडेल, त्यादिवशी शब्द अपुरे पडतील आणि पश्चात्ताप उराशी घेऊन तुम्हालाच मान खाली घालावी लागेल. कारण निष्ठेला पायदळी तुडवणाऱ्यांना इतिहास कधीच माफ करत नाही—तो फक्त वेळ घेतो.
आज हसताय ना?
उद्या त्याच हशामागचं ओझं
तुम्हालाच अश्रूंनी वाहून न्यायला लागेल.

إرسال تعليق

أحدث أقدم