*नांदुरा येथील कावेरी अजयराव जाधव यांना महात्मा गांधी राष्ट्रहित सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित*


नांदुरा प्रतिनिधी : विसावा सोशल फाऊंडेशन, नागपूर व इंटरनॅशनल रिसर्च पब्लिकेशन ऑफ बिझनेस मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नॅशनल सोशल अॅण्ड एज्युकेशन परिषद, नागपूर पुरस्कार सन्मान सोहळा २०२६ मध्येनांदुरा येथील कावेरी अजयराव जाधव यांना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुनीलजी गोडबोले यांच्या हस्ते महात्मा गांधी राष्ट्रहित सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समाजात नवी दिशा देणारे, सकारात्मक विचारांची प्रेरणा निर्माण करणारे तसेच महिला सशक्तिकरण व समाजोपयोगी कार्य केल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या उल्लेखनीय, उत्कट व प्रेरणादायी कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान प्रदान करण्यात येत असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयोजकांनी हार्दिक अभिनंदन व्यक्त केले आहे.
हा भव्य पुरस्कार सोहळा शनिवार, दि. १० जानेवारी २०२६ रोजी विदर्भ हिंदी साहित्य मधुरम सभागृह, नागपूर येथे पार पडणार आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला असून, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन विसावा फाउंडेशन, नागपूर यांच्या वतीने करण्यात आले असून, राष्ट्रीय स्तरावर समाजहिताचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

إرسال تعليق

أحدث أقدم