आक्रमक आव्हान / आंदोलन आवाहन ⚠️दिनांक 8/12/2025 रोजी अवैध वाळू पंपिंगविरोधातदिलेल्या तक्रारीवर

 आजपर्यंत एकही पत्रव्यवहार नाही, एकही कारवाई नाही!
महसूल प्रशासन कुंभकर्णासारख्या गाढ झोपेत असून
नदी, पर्यावरण व शासन महसूलाची खुलेआम लूट सुरू आहे.
त्यामुळे समाजवादी पार्टी तर्फे
📅 उद्या दिनांक 20/1/2026 (मंगळवार)
⏰ सकाळी 11 वाजता
📍 तहसिल कार्यालय, नांदुरा समोर
🔥 “दफडे/ढोल वाजवा – झोपलेल्या महसूल प्रशासनाला जागवा”
हे तीव्र, लोकशाही व शांततामय आंदोलन करण्यात येणार आहे.
👉 आजपर्यंत प्रशासनाने दुर्लक्ष केले, उद्या जनता उत्तर देणार!
👉 प्रशासन जागे झाले नाही तर लढा अधिक तीव्र होईल!
✊ सर्व समाजवादी कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे.
— अन्याय सहन केला जाणार नाही,
लढा थांबणार नाही!
आझाद खा युनुस खा पठाण
युवा जिल्हाध्यक्ष – समाजवादी पार्टी
जिल्हा बुलढाणा

إرسال تعليق

أحدث أقدم