नांदुरा — मेहकर येथे नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत नांदुरा नगरपरिषदेतून निवडून आलेले शिवसेनेचे नगरसेवक रोशनभाऊ पांडव व विनायकभाऊ बोडखे, तसेच अपक्ष म्हणून निवडून आलेले लालाभाऊ इंगळे यांचा भव्य सत्कार केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, खासदार मा. प्रतापरावजी जाधव यांच्या शुभहस्ते पार पडला.
या प्रसंगी मा. जाधव यांनी नांदुरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे तसेच सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे शहराच्या विकासासाठी काम केल्यास नांदुराचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या सत्कार समारंभास शिवसेना जिल्हाप्रमुख संतोषभाऊ डिवरे, तालुकाप्रमुख सुनीलभाऊ जुनारे, प्रभारी शहरप्रमुख ह.भ.प. रामभाऊजी झांबरे महाराज, सुभाषभाऊ पेठकर, श्यामभाऊ राखोंडे, नितीनभाऊ लहाने यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांनी जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नांदुरा शहराच्या विकासासाठी पक्षभेद विसरून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Tags
नांदुरा