समाजवादी पार्टीचा इशारा मलकापूर, नांदुरा आणि खामगाव तालुक्यात चालू असलेल्या अवैध बायोडिझेल विक्री व साठवणुकी विरोधात समाजवादी पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे.


युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन देत म्हटलं आहे —
> “शासन निर्णय ‘डिझेल 2020’ आणि परिपत्रक 2021 नुसार परवाना व १४ विभागांची NOC घेणे बंधनकारक आहे. तरीही अनेक पंप शासन मान्यतेशिवाय चालू आहेत. जिल्हा पुरवठा विभाग केवळ कागदी कारवाई दाखवतो, प्रत्यक्ष पंप सुरूच आहेत.”
पठाण यांनी प्रशासनाला मागणी केली —
सर्व पंपांची तपासणी करून बेकायदेशीर पंप तात्काळ बंद करावेत.
दोषी पंपमालक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
⚠️ इशारा:
> “जर 20 ऑक्टोबर 2025 पूर्वी कारवाई झाली नाही, तर समाजवादी पार्टी नांदुरा तहसील कार्यालयासमोर ‘दफडे बजाव आंदोलन’ उभारेल. प्रशासन गप्प बसलं तर जनता रस्त्यावर उतरेल!” — आझाद पठाण, युवा जिल्हाध्यक्ष, समाजवादी पार्टी
📤 प्रती पाठविण्यात आल्या:
पंतप्रधान, पेट्रोलियम मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हा पुरवठा अधिकारी, पोलिस प्रशासन.
🔥 “भ्रष्टाचार थांबवा – अवैध पंप बंद करा!”

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने