कुरेशी/कसाई समाजाला अनुसूचित जाती sc आरक्षणाचा लाभ द्यावा – अॅड. वसीम कुरेशी यांची मुख्यमंत्रींकडे मागणी

मुंबई :
कुरेशी / कसाई / कसाब / खाटीक समाजाला अनुसूचित जाती (SC) आरक्षणाचा पूर्वीप्रमाणे लाभ देण्यात यावा, अशी मागणी बीड जिल्ह्यातील अॅड. वसीम कुरेशी यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे. त्यांनी आपला अर्ज जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मंत्रालयात सादर केला.

अॅड. कुरेशी यांनी निवेदनात नमूद केले आहे की, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने सन 1961 च्या गॅझेट अधिसूचनेत कुरेशी / कसाई समाजाचा SC प्रवर्गात समावेश केला होता. ही अधिसूचना आजतागायत रद्द झालेली नसतानाही प्रत्यक्षात महाराष्ट्रात या समाजाला अनुसूचित जातीचे लाभ मिळत नाहीत.

“आजच्या घडीला भारतातील मुस्लिम समाजात कुरेशी/कसाई समाज हा सर्वात मागासलेला असून शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात अत्यंत मागे पडलेला आहे. युवकांना शिक्षण, नोकरी व शासकीय योजनांचा योग्य तो लाभ मिळत नाही. त्यामुळे शासनाने तातडीने पावले उचलून न्याय द्यावा,” असे अॅड. वसीम कुरेशी यांनी स्पष्ट केले.

त्यांनी पुढे तीन ठोस मागण्या मांडल्या –

1. 1961 च्या नोटिफिकेशनचा पुनरुच्चार करून कुरेशी समाजास अनुसूचित जाती आरक्षणाचा लाभ द्यावा.

2. शैक्षणिक, नोकरी व इतर सर्व शासकीय योजनांमध्ये तातडीने समावेश करावा.

3. जिल्हास्तरावर जातीचे प्रमाणपत्र तातडीने देण्यासाठी आदेश द्यावेत.

या मागणीवर मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा अॅड. वसीम कुरेशी यांनी व्यक्त केली आह

إرسال تعليق

أحدث أقدم