📰 सोशल मीडियावरील बदनामीकारक बातम्यांवरून समाजवादी पार्टी आक्रमक – तात्काळ FIR नोंद करण्याची मागणी

कवठल/ (ता संग्रामपूर . 30 ऑगस्ट) –
समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी दिनांक 26 ऑगस्ट रोजी नांदुरा पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या तक्रारीवर अद्याप FIR नोंद न झाल्याने कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी पसरली आहे. या प्रकरणात समाजवादी पक्षाने आज जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तात्काळ FIR दाखल करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सोशल मीडियावर आझाद पठाण व समाजवादी पार्टीची बदनामी करण्यासाठी खोटी व द्वेषपूर्ण माहिती जाणीवपूर्वक प्रसारित करण्यात आली. ही बाब तपासाअंती गुन्हा सिद्ध होण्याजोगी असल्याचे स्पष्ट असून, तरीही पोलिसांनी FIR दाखल न करणे हे गंभीर व संशयास्पद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पक्षाने आपल्या मागण्या स्पष्ट करताना –

1. 26/08/2025 रोजी दाखल तक्रारीवर तात्काळ FIR दाखल करणे,


2. दोषींवर कठोर व आवश्यक कारवाई करणे,


3. बदनामीकारक व्हिडिओ सोशल मीडियावरून हटविणे,


4. कार्यकर्त्यांच्या सुरक्षेची हमी देणे – अशा मुद्द्यांचा समावेश केला आहे.

समाजवादी पक्षाने इशारा दिला आहे की, जर तातडीने FIR दाखल न झाल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारले जाईल व त्याची संपूर्ण जबाबदारी पोलिस प्रशासनावर राहील.

👉 सदर निवेदन शेख अजमत (युवा जिल्हा सचिव), शेख आवेश (तालुका अध्यक्ष), शेख इकबाल  इतर पदाधिकाऱ्यांनी सादर केले.

إرسال تعليق

أحدث أقدم