मुंबई : देशभरात मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर धर्माच्या नावाखाली होणारे हल्ले, मोब लिंचिंगच्या घटना सातत्याने वाढत असल्याने समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या जीव, कुटुंब आणि व्यवसाय यांचे रक्षण करण्यासाठी मुस्लिम समाजाने शासनाकडे तातडीने मागणी केली आहे की, सिख बांधवांप्रमाणे मुस्लिम समाजालाही स्वतःच्या संरक्षणासाठी कायदेशीररीत्या शस्त्र/अवजार सोबत ठेवण्याची परवानगी द्यावी.
या संदर्भात बोलताना अॅड. वासिम कुरेशी, प्रवक्ते – कुरेश कॉन्फरन्स महाराष्ट्र यांनी सांगितले की,
"दररोज समाजावर होणाऱ्या अन्यायकारक हल्ल्यांमुळे, कायद्याने संरक्षण मिळणे आवश्यक आहे. ज्या प्रकारे सिख बांधवांना धर्मसंरक्षणासाठी किर्पाण बाळगण्याचा घटनात्मक अधिकार आहे, त्याच धर्तीवर मुस्लिम समाजालाही जीवन, मालमत्ता व व्यवसायाच्या रक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची कायदेशीर परवानगी मिळावी."
मुस्लिम अल्पसंख्यांक बांधवांच्या एकमुखी मागणीस शासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात
Tags
मुम्बई