नविन पदभार स्विकारल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या मा. अल्पसंख्याक आयुक्त मा. प्रतिभा इंगळे महोदया यांचा मार्टि कृती समिती, महाराष्ट्र यांच्या वतीने सत्कार व शुभेच्छा देऊन "अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था (मार्टि)" विषयी विशेष चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी समितीतर्फे शासन स्तरावर निवेदन सादर करून, “मार्टि” ही संस्था कार्यान्वयनाच्या प्रक्रियेत असताना, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना महाज्योती व अमृत संस्थेमार्फत तात्पुरता योजनांचा लाभ एकसमान धोरणानुसार मिळावा, अशी विनंती करण्यात आली.
या कार्यक्रमाला मार्टि कृती समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष अँड. अझर पठाण, उपाध्यक्ष सर आसिफ, राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळ, संस्थापक अध्यक्ष डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, फिरदोस फातेमा, सतीश वानखेडे, रामजानी खान, जाहेद अल्कासेरी, इम्रान बाश्वान, लईक अहमद, अब्दुल राफे, अझहर खान, वासिम अहमद, अश्फाक अहमद व अन्य सदस्य उपस्थित होते.
मा. आयुक्त प्रतिभा इंगळे यांनी दिलेल्या प्रतिसादात सांगितले की, "आपली मागणी योग्य असून संबंधित विभागांशी याबाबत पाठपुरावा करून, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना एकसमान लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील. पद भरतीसह सर्व योजनांचा लाभ लवकरच अल्पसंख्यांक तळागाळातील समाजापर्यंत पोहोचवला जाईल, अशी अपेक्षा आहे."
पार्श्वभूमी:
राज्य शासनाने दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी "अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था (मार्टि)" स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मात्र सद्यस्थितीत संस्थेच्या MOA तयार करणे, पदभरती, लेखाशिर्ष प्रस्ताव व सल्लागार नियुक्ती या प्रक्रिया प्रगतीपथावर आहेत.
या कालावधीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून महाज्योती व अमृत या विद्यमान संस्थांच्या माध्यमातून पुढील योजना लागू करण्यात याव्यात, अशी मागणी समितीने केली:
शिष्यवृत्ती व आर्थिक सहाय्य योजना
स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षण मार्गदर्शन
कौशल्यविकास व प्रशिक्षण उपक्रम
परदेश शिक्षणासाठी सहाय्य योजना
समाप्ती:
मार्टि संस्थेचे पूर्ण कार्यान्वयन होईपर्यंत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी हे तातडीचे पाऊल अत्यावश्यक असल्याचे समितीचे मत असून, शासनाने यास लवकरात लवकर मान्यता द्यावी, अशी मागणी या भेटीतून करण्यात आली.